शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
Non-Bailable Warrant Against Nitesh Rane: भाजपाचे कणकवलीचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे, तसेच प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना आज कोर्टाने मोठा दणका दिला आहे. या तिन्ही नेत्यांविरोधात हे अजामिनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. ...
राज्यातील स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...