शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
DCM Eknath Shinde News: मुंबई बँकही आता जनतेची माझी लाडकी बँक झाली आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत राहायला यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
BJP Pravin Darekar News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आदित्य ठाकरे गेले होते. त्यांनी परवानगी घेतली होती का? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...
या प्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करावी. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करा. जे अॅडव्होकेट जनरल शेखर जगताप यांची शासकीय पॅनेलवरून काढून टाका अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. ...
केंद्रातील सरकार मजबूत नाही त्यांना काही खासदारांची गरज लागेल म्हणून ते अशाप्रकारचे प्रयत्न करत असतील परंतु त्यांना यश मिळणार नाही असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. ...