भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
या संदर्भात संजीवनी साखर कारखान्याच्या कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच साखळी येथील रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. ...
मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांच्या नेतृत्वाखाली अकादमीची कार्यकारिणी व मराठीप्रेमींच्या शिष्टमंडळाने पर्वरी येथे मंत्रालयात भेट घेतली. ...