भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन तसेच केंद्रीय गृह खात्याचे अन्य वरिष्ठ अधिकारी, गोव्याचे मुख्य सचिव व्ही. कांडावेलू तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी बैठकीला उपस्थित होते. ...
साखळी सरकारी महाविद्यालय, रवींद्र भवन व शिक्षण खात्याच्या सहकार्याने साखळी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. ...