भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
कला व संस्कृती संचालनालयातर्फे कला अकादमीत आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शास्त्रीय आणि सुगम संगीताचे सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांना गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
मुख्यमंत्री शाळेत येताच शिक्षकांची धावपळ उडाली. मधली सुटी झाली होती. मुले माध्यान्हची वाट पाहत होते. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून इडली-सांबार खाण्यास सुरुवात केली. ...