अखेरच्या चेंडूवर मारलेला षटकार माझ्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण ठरला, अशी प्रतिक्रिया टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध विजयाचा शिल्पकार दिनेश कार्तिक याने दिली. ...
कुठल्याही स्थितीमध्ये दिनेश कार्तिक नेहमी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज असतो. त्याचा अनुभव व अनेक फटके खेळण्यात माहिर असल्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये तो भारतासाठी आदर्श खेळाडू ठरतो, अशा शब्दात भारतीय कर्णधार रोहित शर्माने कार्तिकची प्रशंसा केली. ...
दिनेश कार्तिकने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पाडव्याची गोडी दुप्पट केली. अवघ्या आठ चेंडूंवर दोन चौकार आणि तीन षटकारांसह २९ धावांचा झंझावात हा केवळ आणि केवळ चित्तथरारक असाच होता. ...