सिडकोपाठोपाठ महापालिकेनेही मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीची जबाबदारी झटकून लावली आहे, त्यामुळे सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या आठ हजार इमारतींतील सुमारे ५२ हजार रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. ...
३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत. ...
विविध रिअॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे. ...
श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांत शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असताना मात्र, घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेल्या अतिप्राचीन लेणी पाहण्यासाठी सोमवारीच बंद ठेवले जात आहे. ...
विशेष समिती सभापती निवडणुकीपूर्वी महापौरपदाचा राजीनामा मीना आयलानी यांनी न दिल्यास साई पक्षाला सहकार्य करणार नाही, असा पवित्रा ओमी कलानी यांनी घेतल्याने शहरात इदनानी-कलानी आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...
दारूच्या नशेत वर्तकनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवरून रविवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या बेतात असलेल्या सुरेश भास्कर गोडेराव (३४, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाचवले. ...
काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले. राणे हे मीरा रोडमध्ये राहत होते. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर भाजपा नगरसेवकाचा वाढदिवस साजरा झाला. ...
ज्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले आणि त्या टाकीचे काम दीड वर्षांपूर्वी पूर्णही झाले. मात्र असे असले तरी अजूनही या पाण्याच्या टाकीतून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात नाही. ...