पहिल्यांदा शहरातील बंद पथदिवे आणि नंतर गणपूर्ती अभावाचे कारण देत दोनवेळा सभा तहकूब करण्यात आली होती. मात्र विषयपत्रिकेत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातील १० कोटींच्या कामांचा विषय हा सभा तहकुबीला महत्वाचा मुद्दा ठरला होता. ...
उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ वर्षापूर्वी आंब्याचे रोपटे लावले होते. ते आता बहरले असून या झाडाला त्यांचे नाव देण्यात आल्याने ते अटलजींच्या पश्चात कायम स्मरणात राहणार आहे. ...
मेट्रोसाठी शिवसेनेसह नागरिकांनी आंदोलने केली असताना मेट्रोला मंजुरी दिल्याचे जाहीर करून स्थानकांची नावेही मंजूर झाली आहेत. असे असताना कामाला सुरुवात झाली नसल्याने सरकारने मीरा- भार्इंदरकरांची फसवणूक केली आहे. ...
सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनास मंजुरी दिल्याने आगरी भवनवरून अडचणीत आलेल्या सत्ताधारी भाजपाच्या मदतीला आयुक्त धावले आहेत. ...
केडीएमसीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा गाजावाजा केला असला तरी महापालिका हद्दीतील एक लाख २० हजार नळजोडणीधारकांपैकी केवळ २६ हजार नळजोडणीधारकांना मीटरप्रमाणे पाणी बिले दिली जात आहेत. ...