मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही जिल्हे तापलेलेच असून गुरुवारी सांयकाळी कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापुरला वादळी वा-यासह वळवाच्या पावसाने झोडपले काही ठिकाणी गाराही पडल्या. पावसाने तिघांचे बळी घेतले. ...
सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी १६ वर्षे सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्याविरोधात उपोषण करत संघर्ष केला. गांधीवाद विसरत चाललेल्या जगाला सत्याग्रहाची ताकद दाखवून दिली. त्यांचा जीवनसंघर्ष आणि लढा ‘ले मशाले’ या एकल नाट्यातून उलगडत आहे. ...
नवीन वीजजोड मंजूर करून देण्यासाठी लाच स्वीकारताना महावितरणच्या भोसरी येथील कार्यालयातील सहायक अभियंत्यासह अन्य एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास भोसरी येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ क ...
महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा व सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी विषय समिती सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी बिनविरोध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले नसल्याने सर्वंच समित्यांवर भाजपाचे सभापती बिनविरोध निवडून आले ...
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सेक्टर २३ मधील गणेश तलावातील पाण्याची पातळी खाली गेल्याने तसेच दूषित पाणी आल्याने माशांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल पक्षी आणि प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
वडगाव मावळ येथील न्यायालयाच्या लगत असणाºया शासकीय आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत. ...
शहरातील महत्त्वाच्या दोन नाट्यगृहांची कामे सुरू असल्यामुळे नाट्यरसिकांची गैरसोय झाली आहे. प्रा. रामकृष्ण मोरे आणि आचार्य अत्रे या दोन नाट्यगृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत नागरिकांना नाटक वा इतर कार्यक्रमांपासून दूर र ...
परिसराच्या स्वच्छतेसाठी कायम झटणाऱ्या कष्टकºयांच्या मुलांची आजही परवड सुरूच आहे. शासनाच्या नाकर्ते भूमिकेमुळे या कष्टकºयांची मुले त्यांच्या हक्काच्या शिष्यवृत्तीपासून गेल्या ३ वर्षांपासून वंचित आहेत. आपल्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी कागद, क ...