पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोसायटी फॉर सायन्स इन्व्हाॅरमेंट अँड पीपल (सेप) आणि भवताल मॅगझीन यांच्या वतीने बाणेर, औंध, बालेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये बीजगोळे (सीडबॉल) निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. ...
अनेक नाटकांनी समाजजागृतीचे काम केले आहे. त्यांनीही इतिहास घडविला आहे. त्याचे स्मरण म्हणून मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ रंगभूमीचा इतिहास सांगणारे दालन उभारले जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली. ...
‘एमबीबीएस’च्या पदवीनंतर एक वर्ष इंटर्नशिप करणाऱ्या राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे विद्यावेतन (स्टायपेंड) वाढवून देण्याची मागणी पूर्ण न केल्याने, राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...
पीडीएफ फॉरमॅटमध्ये व्हॉट्सअॅपद्वारे कंपनीने पाठविलेली नोटीस प्राप्तकर्त्याला मिळाली असून, त्याने ती वाचल्याने उच्च न्यायालयाने ती वैध असल्याचे नुकतेच म्हटले आहे. ...
वर्षभराची असलेल्या कुशी सोनीने अनवधानाने इअररिंग गिळली. परळ येथील बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने बुधवारी संध्याकाळी ब्रॉन्कोस्कोपी करून, अवघ्या ३० मिनिटांत ती रिंग बाहेर काढली. ...
विहीरीत पोहले, एवढ्याशा शुल्लक कारणावरून वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पंचनामा करताना पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने २००९ ते २०१४ या कालावधीत राबविलेल्या योजनांमधील घोटाळाप्रकरणी १२ प्रकल्प अधिका-यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...