थायलंडच्या गुहेतून आणखी चार मुलांना बाहेर काढण्यात नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांना सोमवारी यश आले असून, आता गुहेमध्ये केवळ चार मुले आणि त्यांचा फुटबॉल प्रशिक्षक असे पाच जण अडकलेले आहेत. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना लिहिलेल्या पत्रात दिल्ली सरकार आणि केंद्र यांच्या संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारण्याबाबत तुम्ही तुमच्या सोयीचीच भूमिका घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. ...
कथित कनिष्ठ जातीतील विद्यार्थिनीने स्पर्श केलेले अन्नाचे ताट फेकून दिल्याबद्दल कंत्राटावर काम करीत असलेल्या स्वयंपाकी महिलेला सोमवारी सरकारी शाळेतून काढून टाकण्यात आले, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. निमित्त होते पटेल यांच्या मुलीच्या २१ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या विवाहाच्या निमंत्रणाचे. मात्र त्या दोघांत महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा झाली. ...
फ्रान्स व इंग्लंड या जागतिक महासत्तांमध्ये फुटबॉल विश्वामधील सार्वभौमत्वाची लढाई होण्याची दाट शक्यता दिसत आहे. या दोघांकडे बेल्जियम व क्रोएशियाला रोण्याची क्षमता आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसामुळे पालिका क्षेत्रात लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. शरीराला जखम झालेल्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संबंध आल्यास, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. ...