नेवासा पंचायत समितीकडे जळके ग्रामपंचायतीकडे शौचालयाचे प्रस्ताव नसतांनाही अनेक नागरिकांच्या नावावर शौचालय अनुदान टाकून ठेकेदाराने अनुदान परस्पर लंपास केल्याची तक्रार जळके खुर्दचे सरपंच व ग्रामसेवकांनी केली आहे. ...
राष्ट्र भक्तीपासून दूर जाणारे आंतकवादाने मरतील. तसेच राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपले जीवन अर्पण असून राम मंदिर होणारच. भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. ...
जम्मूतील मुफ्ती मेहेबुबा यांचे सरकार बरखास्त करावे व पाकिस्तानबरोबर युद्ध करावे, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पत्रकारांशी बोलताना सूचित केले. ...
एक वर्षात १ कोटी ९३ लाखांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन सोनई पोलिसांनी सोनई येथील व्यंकटेश पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह तिघाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही फरार आहेत. ...
नेवासा तालुक्यातील तामसवाडी शिवारात महसूलचे कर्मचारी शनिवारी रात्री गस्त घालत असताना वाळू तस्करांनी सरकारी वाहनाला धक्का मारून कामगार तलाठ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रविवारी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पुण्याहून औरंगाबादकडे जाणा-या भरधाव बसमधून एका प्रवाशाने अचानक उडी घेऊन जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
ती उच्च शिक्षित... तो साधा शिपाई.. दोघांची ओळख झाली... ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. बहरलेल्या प्रेमातून लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. नियतीला मात्र ते मान्य नव्हते. मुलीचे प्रेमप्रकरण घरापर्यंत जाताच... ...
जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील आठवडे बाजारात शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली. ...