शहरातील खळवाडी भागात राहत असलेल्या एकाकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री शहरात आॅल आऊट स्कीम राबवित असताना नेवासा शहरात बसस्थानक शेजारी खळवाडी येथे राहत असलेल्या सचिन उर्फ गटण्या राजेंद्र पवार (२१) याच्याकडे गावठी कट्टा ...
सोनई (ता. नेवासा) येथील व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील दोन कोटींच्या अपहारप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिघा जणांना अटक केली आहे. ...
नगर- औरंगाबाद महामार्गावर सोमवारी मध्यरात्री स्वीप्ट कार व कंटेनरच्या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाले. लक्ष्मण हिवाळे, संतोष सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश जाधव व मनोज सोनवणे हे जखमी झाले आहेत. ...
ऊस तोडणीसाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी दुपारी नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव शिवारात घडली. याप्रकरणी दोघा जणांविरोधात नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
नेवासा पंचायत समितीकडे जळके ग्रामपंचायतीकडे शौचालयाचे प्रस्ताव नसतांनाही अनेक नागरिकांच्या नावावर शौचालय अनुदान टाकून ठेकेदाराने अनुदान परस्पर लंपास केल्याची तक्रार जळके खुर्दचे सरपंच व ग्रामसेवकांनी केली आहे. ...
राष्ट्र भक्तीपासून दूर जाणारे आंतकवादाने मरतील. तसेच राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपले जीवन अर्पण असून राम मंदिर होणारच. भगव्याला त्रास देणा-यांचा सर्वनाश होईल, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. ...
जम्मूतील मुफ्ती मेहेबुबा यांचे सरकार बरखास्त करावे व पाकिस्तानबरोबर युद्ध करावे, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पत्रकारांशी बोलताना सूचित केले. ...