वाळू तस्करांना खबर देणा-या चार खब-यांवर नेवासा तहसीलदार उमेश पाटील यांनी कारवाई केली. संदीप सुरेश जाधव, समीर इसाक इनामदार, विलास मच्छिंद्र पवार, राजेंद्र शंकर धनवटे या चार खब-यांना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
पोपटराव पाटील यांनी सतर्कता दाखवून परवाना असलेल्या बंदुकीतून केलेला गोळीबार व पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे पाटील यांच्या तालुक्यातील माळेवाडी येथील वस्तीवर दरोड्याचा प्रयत्न फसला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ...
तालुक्यातील १५१ पैकी ११० स्वस्त धान्य दुकानदारांवर दंडात्मक कारवाई झाल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ७० टक्के पेक्षा कमी लाभार्थ्यांना धान्य पुरवठा झाल्या कारणाने या कारवाईला स्वस्त धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. ...
अहमदाबाद येथील एका शनी भक्तांकडून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा सोन्याचांदीचा कलश शनी चरणी अर्पण करण्यात आला. ५१० ग्रॅम सोनं व ४ हजार २९० ग्रॅम चांदी असणारा हा कलश अर्पण करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील घोगरगाव शिवारात घुमनदेव ते जुने घोगरगाव या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर दोन जण पसार झाले. ...
तालुक्यातील घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्च मधून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेली घंटा नेवासा तालुक्यातील बेलपांढरी शिवारात शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना पोलिसांना आढळून आली. ...
अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावर घोडेगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रेलर दुभाजकावर चढल्याने रस्त्यावरच पलटी झाला. या ट्रेलरने आराम बसला धडक दिली. त्याच आराम बसला कार धडकली. सुदैवाने यामध्ये जिवितहानी झाली नाही. हा अपघ ...