गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे ...
शासनाच्या बालनाट्य स्पर्धेला कलाकार घडविणा-या कार्यशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोकण विभागीय स्पर्धेमध्ये तब्बल ६३ नाटके सादर केली जाणार असून ६०० पेक्षा जास्त कलाकार सहभागी झाले आहेत. स्पर्धेतून चांगले बालकलाकार घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात ...
शासनाने विमानतळ प्रभावित क्षेत्राचा (नैना) विकास करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली. परंतु सिडकोच्या उदासीन धोरणांमुळे पाच वर्षांमध्ये २९२ पैकी फक्त ४२ प्रकल्पांनाच बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. ...
वाघिवली येथील संरक्षित कुळाचा हक्क डावलून बेलापूर येथे करण्यात आलेल्या भूखंड वाटपाची शासनाने चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने सिडकोला पत्र पाठवून या प्रकरणांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
खारघर ते पनवेल या मार्गावर एनएमएमटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका संजना समीर कदम यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे. ...
देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे. ...
शासकीय अवकृपेमुळे देशातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. २० हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बाजारपेठेसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ...
‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर तालुक्यांमध्ये नवी मुंबईचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. यामुळे नवी मुंबईतील रहिवाशांकडून केल्या जाणा-या अर्जाची पूर्तता करण्यात अडथळा येत आहे. परिणामी नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रांकडे धाव घ्यावी लागत असून, अतिरिक्त पैसे दे ...