रविवारी सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग थेट ३६ हजारांपर्यंत वाढविला गेला. दुपारपर्यंत हा विसर्ग ४५ हजारांपर्यंत पोहोचल्याने गोदावरीला महापूर आला. या महापुराने गोदाकाठालगत असलेल्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या. ...
सातपूर-अंबड लिंकरोडवरील विद्युत जनित्र व रोहित्राभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महावितरणने अनिश्चित काळासाठी विद्युत पुरवठा खंडित केला आहे, तर खंडित विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे ...
देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान रेल्वे मोरीखालील भराव अतिवृष्टी व पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मोरीवरील रेल्वे पूल रुळ व स्लीपर लटकत असल्याचे रेल्वे गेटमनच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी मोरीखालील भराव वाहून गेल्याचे रेल्व ...
गोदावरी व दारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे रविवारी नाशिक तालुक्यातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या गावांना पुराचा बसलेला फटका सोमवारी काही प्रमाणात ओसरला. ...
पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांच्या कथड्यांना मोठ्या प्रमाणात पाणवेली आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह कापडाचे तुकडे अडकल्याचे समोर आले आहे. रविवारी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला रविवारी (दि.४) पूर आला आहे. नाशिकसह मुंबई आणि अन्य परजिल्ह्यांतदेखील पाऊस सुरू असल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहे. ...
नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली. ...
जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. दारणा धरण परिसरात रविवारी मुसळधार पाऊस कायम होता त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीने धोकादायक पातळी ओलांडली. ...