शहरातील फुटपाथवर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे पादचारी मुख्य रस्त्याचा वापर करीत आहेत़ त्याचबरोबर या दुकानासमोरच वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने शहर वाहतूक शाखेने अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे़ ...
लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी व फडणवीस सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर हे सगळेच अडचणीत आले आहेत. ...
वसरणी भागातील शासकीय दूध डेअरीची तीन हजार लिटर दूध संकलनाची क्षमता असून त्यापेक्षा अधिक दूध आल्यास ते घेण्यास नकार देण्यात येत आहे़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी दूध डेअरीच्या प्रवेशद्वारावरच शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला़ ...
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून औषधींचा प्रचंड तुटवडा आहे़ त्यामुळे गरीब रुग्णांना पदरचे पैसे खर्च करुन बाहेरुन औषधी आणावी लागते़ ...