घरात घुसून विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी शुक्रवारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. ...
दोन महिन्यांवर आलेल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मृत्यूला कवटाळलेल्या नानासाहेब भवर यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे़ ...
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे़ शुक्रवारी नांदेडचा पारा ४४़५ अंशांवर गेला होता़ गेल्या पाच वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद शुक्रवारी करण्यात आली़ ...
हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले ...
येथील नगरपालिका अंतर्गत असलेल्या धर्माबाद शहराला एक नव्हे दोन दिवस नव्हे, तब्बल सात दिवसापासून ऐन उन्हाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. ...
जिल्ह्यातील वाळू घाटावरील अवैध प्रकार रोखण्यासाठी आता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कार्यरत तालुका सोडून अधिकारी आता दुसºया तालुक्यातील घाटांना दरमहा भेटी देणार आहेत. ...
शहरातील विशेषत: दक्षिण नांदेडातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला असून, विष्णूपुरी प्रकल्पात असलेल्या ८.५७ दलघमी पाण्यातून जूनपर्यंत तहान कशी भागवायची, हा प्रश्न निर्माण झाला असून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विष्णूपुरी प्रकल्प पर ...