नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz Read More
नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. याच निमित्ताने टीव्हीवरील अत्यंत लाडका शो असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गांबाबत जाणून घेऊया. ...
Namrata Sambherao : नुकतेच सांगली येथे प्रयोगासाठी जाताना नम्रताने एका ढाब्यावर तिच्या टीमसाठी जेवण बनवलं. त्याचा व्हिडीओ लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद खांडेकरने शेअर केला आहे. ...
विनोद बुद्धी आणि अभिनयाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या वनिताचा आज वाढदिवस आहे. वनिताच्या वाढदिवशी अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्यासाठी खास पोस्ट केली आहे. ...
एकीकडे मराठी-हिंदी वाद सुरू असताना दुसरीकडे एका गाजलेल्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक होत आहे. मुक्ता बर्वेचा सिनेमा गुजरातीत प्रदर्शित केला जाणार आहे. ...
हास्यजत्रेतील कलाकार ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवताना दिसतात. आता या अवली कलाकारांनी "सुटला माझा पदर, बाई मी नव्हते भानात अन् काळुबाईचं वारं माझ्या भरलं अंगात" या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. ...