१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते. Read More
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत त्वरित आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या १० आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात लाक्षणिक उपोषण केले. ...
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकार विरोधात नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या ‘जनआक्रोश-हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी दोन्ही पक्षाचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते नागपूरच्या रस्त्यावर उतरले आहेत ...
ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा फटका अनेक उच्चशिक्षितांना बसतो आहे. जळगाव जिल्ह्यातील दिलीप साळवे हे व्हेटर्नरी डॉक्टर आहेत. सरकारी नोकरीसाठी जंगजंग पछाडले, पण नशिबाला कोतवाली भेटली. ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. याचा फटका विमानतळावर जाणाऱ्या व्हीआयपींनाही बसला. वाहतूक कोंडीत अडकल्याने १२ प्रवाशांना विमान मिळाले नाही, अशी ...