१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते. Read More
मेट्रोच्या नावाखाली मुंबईत होणारी वृक्षतोड, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व रिफायनरीला शिवसेनेचा विरोधच राहणार आहे. जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी विधान परिषदेत ...
अपराधी जमात म्हणून समाज आणि शासन पारधी समाजाकडे दुर्लक्ष करीत आले आहे. शिकार करणे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या समाजावर शासनाने शिकारीवर बंदी आणून उपासमारीची वेळ आली आहे. ...
‘अ’ श्रेणीत असलेल्या १२३ शाळा व कर्मशाळांना १०० टक्के अनुदानाचे आदेश निर्गमित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दिव्यांग (अपंग) शाळा व कर्मचारी कृती समितीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. ...
जुनी पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुंडण करून विधानभवनावर मुंडण मोर्चा काढला. ...
अंध बांधवाना रेल्वे परिसर व रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी उपयोगी वस्तू विक्रीचा व्यवसाय करता यावा यासाठी परवाना द्या, या मागणीसाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्यावतीने सोमवारी अंध बांधवाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला. ...
अकोला येथील संतोषी माता मंदिरजवळच्या ३७१७.१७ वर्ग मीटरच्या शासकीय भूखंडाचे बोगस दस्तावेज तयार करण्याचा मुद्दा शुक्रवारी विधानसभेत गाजला. आमदारांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरीत याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ...
मुंबई येथील मनोरा आमदार निवास इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मंत्रालय परिसर येथे आमदारांना निवासाची व्यवस्था करण्यासाठी विभागातर्फे कार्यवाही करण्यात येत आहे. येत्या महिन्याभरात आमदारांना नवीन रचनेबाबत मा ...