मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर, बल्लारशाह, बैतूल, चंद्रपूर व वर्धा रेल्वे स्थानकांसाठी सहा आठवड्यांत बुट पॉलिशचे टेंडर जारी करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. ...
जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरातून सुटणाऱ्या दोन रेल्वेगाड्या गुरुवारी महिला कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे. ...
नागपूर रेल्वे स्थानकाला ‘एनएसजी-२’ चा (नॉन सबरबन ग्रुप) दर्जा मिळाला आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील रेल्वे स्थानकांना वेगवेगळा दर्जा देण्यात आला. त्यात नागपूर रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. ‘एनएसजी-२’ दर्जानुसार त्यात काय सोय ...
रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या तीन कारवायात दारूच्या १०९५० रुपये किमतीच्या ३७८ बॉटल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. होळीसाठी दारुबंदी असलेल्या व ...
कोचमध्ये खूप कचरा साचलेला, शौचालयातील पाणीही संपले. यामुळे संतप्त झालेल्या संत्रागाछी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी पाऊणतास रोखून धरली. ही घटना गुरुवारी सकाळी ९.०५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६ वर घडली. ...
नागपूर रेल्वेस्थानकाला आंतरराष्ट्रीयस्तराचे बनविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तयारी केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सृजन या उपक्रमांतर्गत नागपूर रेल्वेस्थानकाची निवड करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात असलेले एस्केलेटर (स्वयंचलित जीना) गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद असल्यामुळे या भागातून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.गुरुवारी सका ...
ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील एक प्रवासी खाली उतरला. घाबरलेल्या अवस्थेत तो इकडे-तिकडे पळत सुटला. आरपीएफ जवानांनी त्यास कारण विचारले असता आपल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे त्याने सांगितले अन् आरपीएफ जवानांसह प्रवाशांनाही थोड्या वेळासाठी घाम फुटला. त्याच्या ...