सद्यस्थितीला उपराजधानीतील सर्वात स्मार्ट तहसील, सोनेगाव आणि यशोधरानगर पोलीस ठाणे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच शहरातील मान्यवरांच्या समितीने केलेल्या पोलीस ठाण्याच्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार झाला असून, तो आज गुरुवारी जाहीर करण्यात आला. ...
दक्षिण नागपुरातील चर्चित मारुती नव्वा याला फोनवर जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने दक्षिण नागपुरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. मारुतीने यासंदर्भात नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
देशात राष्ट्रीय कन्या दिवस साजरा होत असतानाच गणेशपेठ ठाण्यांतर्गत बुधवारी सकाळच्या सुमारास अंदाजे तीन ते चार दिवसांची नवजात चिमुकली आढळल्याने खळबळ उडाली. ...
जुगार अड्ड्यावरून झालेल्या गँगवॉरमध्ये सारंग मदने याची हत्या झाली. हे प्रकरण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या साप्ताहिक बैठकीत उमटले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गिट्टीखदान ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला फटकारत सारंग हत्याकांडाची माहिती विचारली. ...
हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या एका व्यापारी व त्याच्या कुटुंबीयाच्या विरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये आकाश वाट, त्याची आई संध्या वाट, बहीण मेघा कारेमोरे, जावई नरेंद्र कारेमोरे यांचा समावेश आहे. ...
विविध ठिकाणी साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने शाखा सुरू करून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात ठगबाज पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल याच्या मध्य प्रदेशात जाऊन गुन्हे (आर्थिक) शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. ...