मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील घाटकाेपरमधील चिराग नगरी येथील आण्णाभाऊंचं राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूच्या 7 हेक्टर जागेमध्ये आण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक राज्य सरकार करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
'गेटींग रेडी फॉर जुहू मॅरेथॉन, सम बायकर ट्राईड टू हरॅस माय फ्रेंड', असे एक ट्विट रविवारी सकाळी मुंबई पोलिसांना करण्यात आले. जुहूमध्ये हा प्रकार घडला असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला होता. ...
धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यानंतरही गेले तीन वर्षे दुरुस्तीचे कागदी घोडे नाचविणाऱ्या महापालिका प्रशासनाला अखेर प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त मिळाला आहे. मोडकळीस आलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचे काम आगामी वर्षात सुरु होणार आहे. ...
‘बर्ड रेस’ अभियानांतर्गत मुंबईसह वसई येथील नैसर्गिक अधिवासात पक्षिप्रेमींनी नुकतेच पक्षी निरीक्षण केले. शहरात जेथे पक्ष्यांचा अधिवास आहे तेथे ३८० पक्षिप्रेमींनी भेट देऊन दुर्मीळ पक्ष्यांसह इतरही पक्ष्यांच्या नोंदी केल्या. ...
वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्यात येणार आहे. हेरिटेज दृष्ट्या ए-वन दर्जा असलेल्या या स्थानकाचे रूप पालटवण्याचे काम पुढील सहा ते आठ महिने सुरु राहणार आहे. ...