मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
भारत निवडणूक आयोगाच्या मंजूरीनंतर मदान यांची नियमित नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज सकाळी अकराच्या सुमारास पदभार स्विकारून कामकाजास सुरुवात केली. ...
सात लोकसभा मतदारसंघांमध्ये कुठे आघाडीचे तर कुठे युतीचे उमेदवार न ठरल्याने लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसच्या तीन, भाजपाच्या दोन तर राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीच्या प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही. ...
कायदा गाढव आहे. सगळे वकील हे फसविणारे, लबाड असतात. मग न्यायाधीश हे या सर्वांवर औषध आहे का, असा धक्कादायक प्रश्न चक्क मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधि महाविद्यालयाच्या पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. ...
आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम पाच दिवस उरले असताना मालमत्ता कराचे लक्ष्य अद्याप महापालिकेला गाठता आलेले नाही. त्यामुळे थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. ...
आर्थिक संकटात असल्यामुळे बेस्ट प्रशासनाने अद्याप आपल्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार दिलेला नाही. तर नफ्यात असलेल्या विद्युत पुरवठा विभागाने बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत थोडी भर घालण्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई सुरू ठेवली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर धावपट्टीची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे होईल. ...