पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे हे अनाथ आहे. शिवसेना पीडित लोकांना मदत करत आहे. सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करायला हवे होते. पुणे महापालिकेतील आजी व माजी सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ...
मुठा कालवा दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे.अशा सर्वांचे पंचनामे करुन पीडितांना त्याप्रमाणे मदत केली जाईल असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...
लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना, लेखी पत्र आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊनही महापालिका आणि पाटबंधारे विभागाने मात्र निष्क्रियता कायम ठेवल्यानेच मुठा कालवा फुटल्याचा दुर्दैवी प्रसंग उद्भवल्याचा थेट आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. ...
गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शहरातील दांडेकर पुलाजवळ कालवा फुटून झालेल्या मोठ्या नुकसानामागे संरक्षक भिंतीत टाकण्यात आलेल्या केबल जबाबदार असल्याचा नवा मुद्दा समोर येत आहे. ...