टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले. परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. Read More
Actor Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी ८९व्या वर्षी निधन झाले. अखेरच्या दिवसांमध्ये त्यांना रुग्णालयातून रजा देऊन घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. अनेक सेलिब्रिटी त्यांना भेटण्यासाठी घरीही गेले होते. यापैकी एक होते अभिनेते मु ...
'रामायण'मध्ये लारा दत्ता, सनी देओल, यश, रवी दुबे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या बिग बजेट सिनेमासाठी मुकेश खन्ना यांनाही विचारणा झाली होती. मात्र त्यांनी 'रामायण'मध्ये काम करण्यास नकार दिला. ...
'रामायण'च्या टीझरमध्ये रणबीरची श्रीरामाच्या लूकमधील झलकही पाहायला मिळाली. यावर आता शक्तिमान अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरला श्रीरामाच्या रुपात पाहणं मुकेश खन्नांना रुचलेलं नाही. ...
Mukesh Khanna : ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान लग्न न करण्याचे कारण सांगितले. यासोबतच त्यांनी लग्नाबाबतही आपले मतही मांडले. ...