गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. तब्बल अठरा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. पुराचे पाणी सोनाळीतील अभिनव विद्यामंदिरच्या आवारात घुसल्याने शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. त्यामुळे अर्ध्यावर शाळा सोडण्यात आली. ...
पावसाने सुरूवातीपासूनच दिलासा देण्यास सुरूवात केली असून, पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरासरी ओलांडली आहे. यावर्षी संपूर्ण महिनाभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या एकाच महिन्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ३६७ सेंटीमीटर सरासरीने पाऊस अधिक ...
कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी व राधानगरी तालुक्यांत गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला. उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरामध्ये दिवसभर रिमझिम सुरू राहिली. ...
गेल्या पंचवीस दिवसांपासून अडून बसलेल्या पावसाने सांगली, मिरज शहर व परिसरात गुरुवारी हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधुनमधून रिमझिम सरी असे वातावरण होते. ...
साताऱ्याला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे सात वाजल्यापासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह धरण परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाने धुवाँधार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून, कोयनेत तर दुपटीने आवक होत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १५२ मिलीमीटर पा ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी गगनबावडा, शाहूवाडी, चदंगड तालुक्यात दमदार पाऊस झाला. उर्वरित तालुक्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसाने हजेरी लावल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे. भोगावती नदीवरील एक, तर पंचगंगा नदीवरील तीन, असे च ...