लॉकडाऊन करताना मजुरांचा विचार केला नाही. राज्यांनी जमेल तेवढे केले. आता शेवटच्या टप्प्यात कर्नाटक, उत्तर प्रदेशने आपल्याच लोकांना नाकारून त्यांच्याशी असलेले भावनिक नातेही तोडून टाकले. जालन्यात गेलेले बळी यातून आलेल्या असहायतेचे आहेत. ...
राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यात प्रवासाच्या परवानगीसाठीच्या वाहतूक परवान्यांचे वाटप सुरू झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नागपूर जिल्ह्यातील २ हजार १४९ नागरिकांना वाहतूक परवाने देण्यात आले. ...
राज्य सरकारच्या निर्णयामुळे तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी ...
हजारो किलोमीटरची पायपीट करत असताना मजुरांच्या पायातील चपला-जोडे अक्षरश: फाटले आहेत. अनेक जण नाईलाजाने भर उन्हात अनवाणी पायाने चालत आहेत. पांजरी येथील टोलप्लाझाजवळ हे मजूर विश्रांतीसाठी थांबत असताना त्याची ही दयनीय अवस्था लक्षात येत आहे. अशा स्थितीत त ...
लॉंकडाऊनमुळे अडकून पडलेल्या क.ामगारांना सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानुसार कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. ...
केंद्र-राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. ...