कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन‘मुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर झालेल्या १३ हजार ५६३ नागरिकांची १४१ निवारागृहे (शेल्टर होम) व्यवस्था करण्यात आली आहे. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमावबंदी जारी केली आहे. हा कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्तींना शहरात डिटेन केले असून दुकाने सुरू ठेवणाऱ्या ५३ दुकानदारांवर कारवाई केली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ...
नागपूर शहर कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारतर्फे येथे पूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आले आहे. सध्या हा निर्णय केवळ नागपूर शहरापुरता घेण्यात येत आहे. ...
आता कोराना संशयित रुग्णांचे त्यांच्या घरीच विलगीकरण (होम क्वॉरेंटाईन) करण्यात येणार आहे. अशा रुग्णांनी नियंत्रण कक्षाला फोन केला, तर आमची तज्ज्ञ प्रशासनाची चमू त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘स्वॅप’ (नमुने) घेऊन येतील. ...