lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा वॉटर ग्रीड

मराठवाडा वॉटर ग्रीड, व्हिडिओ

Marathwada water grid, Latest Marathi News

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून  या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Read More