मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोलचा दर कमी आहे. यामुळे पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याची शक्यता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फेटाळून लावली आहे. ...
पणजीपासून जवळच असलेल्या बायंगिणी गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यासाठी काही लोक तसेच पुरातन वारसाप्रेमी विरोध करत असल्याने आणि मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासही काही एनजीओ आक्षेप घेत असल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सथ्य ...
गोव्यातील सगळ्या सरकारी खात्याकडून यापुढे प्लॅस्टिकचा वापर बंद केला जाईल असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पणजीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. ...
गोव्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये या महिन्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो लावले जाणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व खाते प्रमुखांना तशी सूचना केली आहे. ...