मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
हरिद्वारमधील पतंजली विद्यापीठाकडून गोव्याच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्या आधारे गोव्यातील विद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ...
पर्रीकरांचा निर्णय गोव्यात फार चर्चेचा विषय ठरण्यामागे सध्या एका मोठ्या वादाची पार्श्वभूमी आहे. उच्चवर्णीय विरूद्ध बहुजन असे टोक या वादाने गोव्यात गाठले. ...
गोव्यातील सरकारी कोकणी अकादमीकडून दिल्या जाणा-या साहित्य आणि भाषा सेवा पुरस्कार प्रक्रियेबाबत गोव्यात यावेळी प्रथमच मोठा वाद झाला. परिणामी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी साहित्यिक सर्जिकल स्ट्राईक करून आता सगळे 32 पुरस्कार रद्द ठरविले आहेत. ...
गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा तब्बल 7 हजार जणांनी लाभ घेतला असून या योजनेंतर्गत आतापर्यंत 80 कोटी रुपये वितरित झाले आहेत. आर्थिक विकास महामंडळातर्फे (ईडीसी) राबवल्या जाणा-या या अल्पव्याजी कर्जाच्या माध्यमातून दिवसाकाठी सरासरी चारजण उद्योजकते ...
देश-विदेशातून गोव्यात येणार्या पर्यटकांच्या मनात गोवा म्हणजे दारू असे समीकरण झालेले असते पण वस्तूस्थिती थोडी वेगळी आहे. मद्य व्यवसाय हा गोव्यात महत्त्वाचा आहेच, पण गोव्याच्या ग्रामीण भागातील महिला त्यांच्या नवर्यांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळल्या अ ...
गोव्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या भिंतीवर बापूजी म्हणजे महात्मा गांधी यांचे फोटो आहेतच. मात्र आता शाळांच्या भिंतीवर बापूंसोबत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही फोटो लावलेले पाहायला मिळतील. ...