मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
पणजी : गोव्यातील भारतीय जनता पक्षात सध्या दोन गट कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या गटाने आपण भाजपच्या येथील कार्यालयात सातत्याने बसणार असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पक्ष संघटनेने वेगळे धोरण स्वीकारले आहे. ...
गोव्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळा व सरकारी शाळांमध्ये पंतप्रधान व राष्ट्रपतींचे फोटो लावा, अशा प्रकारची सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शिक्षण खात्याला केली होती. ...
माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांची पीडीएच्या आधारे सरकारमध्ये एन्ट्री होत असल्याने बाबूशचे राजकीय शत्रू असलेले पर्रीकर सरकारमधील काही मंत्री अस्वस्थ बनले आहेत ...
समुद्र किना-यावरील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच किना-यावर आनंद लुटण्यासाठी येणा-या पर्यटकांना तसेच लोकांना सहकार्य व सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने कळंगुट किना-यावर पोलीस बुथची उभारणी करण्यात येणार आहे. ...
गोव्यातील सगळे आमदार तणावाखाली आहेत. हा ताण देणग्यांचा आहे. समाजातील प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना देणगी द्यावी लागते. यामुळे आपले सरकार लवकरच आमदारांचे विविध भत्ते वाढवणार आहे असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले ...