मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
शेतकऱ्यांना शेती बागायतीला पाणी मिळावे यासाठी सौर ऊर्जा उपकरणे खरेदीकरिता अर्थसहाय्याची योजना येत्या वर्षात अधिसूचित केली जाईल, अशी घोषणा गोव्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी केली. ...
एखाद्या उद्योगाने जर ८0 ते ६0 टक्के गोमंतकीयांना नोक-या दिल्या नाहीत, तर त्या उद्योगाला आम्ही प्रोत्साहनपर किंवा सलतीच्या योजनेचा लाभ देणार नाही पण तो उद्योग बंद करता येत नाही, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. ...
पणजी : बार्देश तालुक्याला रवींद्र भवन हवे आहे. म्हापशात आतापर्यंत जागा निश्चित होऊ शकली नाही. आपण पुढाकार घेऊन लवकरच जागा निश्चित करू, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. ...
राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले असल्याने मी देखील राहुलजींचे अभिनंदन करतो. जरी राहुल अध्यक्ष बनल्याने घराणेशाहीचे एक सर्कल पूर्ण झालेले असले तरी ही एक मोठी घटना असून आपण अभिनंदन करण्याच्या प्रक्रियेत त्यामुळेच सहभागी होतो, अस ...
गोव्यात पोलिसांना 30 नवे अल्कोमीटर सरकार लवकरच देणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, असं गृह खातं सांभाळणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केलं आहे. ...
पणजी : राज्यात वाहतूक शिस्तीच्या बाबतीत कडक उपाययोजना करण्यात येणार असून, वाहन परवाने देण्याच्या बाबतीत सुसूत्रता, विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण या गोष्टींबरोबरच कारवाईही आणखी कडक केली जाईल. ...
गोव्यात येणारे बरेच पर्यटक उघड्यावर कुठेही स्वयंपाक करतात. शिवाय तिथेच कचराही टाकून जातात. सरकार येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरपासून सरकारी यंत्रणा कारवाई सुरू करील असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरूवारी विधानसभेत जाहीर केले. ...
कोणत्याही प्रकल्पाला परवानगी न देण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशातून महत्त्वाच्या प्रकल्पांना वगळण्यात यावे यासाठी राज्य सरकार मूळ आदेशात दुरुस्ती करण्यासाठी हरित लवादाकडे याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सा ...