मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
सेंंद्रीय शेतीबाबत शेतक-यांना धडे मिळावेत, त्यांनी शेती-बागायतीचे उत्पन्न वाढवावे यासाठी इस्रायली कंपनीला गोव्यात विशेष केंद्र उघडण्यास सांगितले जाईल. ...
कर्नाटक राज्याला पिण्याचे पाणी वापरण्यासाठी द्यावे पण ते केवळ म्हादईच्या खो-यातच वापरले जात असेल तरच मान्यता द्यावी, अशा प्रकारची भूमिका गोवा सरकार हळूहळू घेऊ लागले आहे. ...
राज्याचे दरडोई उत्पन्न हे 4 लाख 25 हजार 84 रुपये आहे तर कर्जाचे प्रमाण 81 हजार 764 रुपये आहे. म्हणजेच उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण 19.23 टक्के आहे. ...
होमगार्ड्सना महिन्यातून २६ दिवस काम दिले जाणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले. आठवड्यातून दोनवेळा सुट्टी संबंधी अद्याप त्यांना लेखी आदेश देण्यात आला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झालेल्या राहुल गांधींसाठी अध्यक्ष होताच हा पहिला पराभव ठरला. ...