मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
म्हादई नदी केवळ गोव्यातूनच वाहत नाही तर ती कर्नाटक आणि महाराष्ट्रातून देखील वाहते. त्यामुळे म्हादई नदीच्या पाण्याचे गोवा व कर्नाटक यांच्यात वाटप होणो हे अपरिहार्य व अटळ आहे ...
म्हादई पाणीतंटाप्रश्नी कर्नाटकमधील भाजपाचे नेते येडीयुरप्पा यांनी मला पत्र पाठविल्यानंतर मी त्यांना पत्र लिहून उत्तर दिले व चर्चा करण्यास तयार असल्याचे कळविले. यात काहीच गैर नाही. कायद्याच्यादृष्टीकोणातून हे पत्र अतिशय योग्य आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी भाजपाच्या पणजीतील मुख्य कार्यालयात तीन ते चार तास उपस्थित राहिले व त्यांनी राज्यातील सात- आठ मतदारसंघांतील भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे, त्यांच्या मागण्या व अपेक्षा जाणून घेतल्या. ...
म्हादईच्या प्रश्नावर गोवा प्रदेश शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ‘बॅड सांताक्लॉज’, अशी संभावना केली आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना देशाच्या विविध भागांतील जनतेमध्ये मान असला तरी, काही विषयांबाबत पर्रीकर हे कायम धक्कादायक, अनाकलनीय आणि एकतर्फी भूमिका घेत असल्याने ते गोवा आणि गोव्याबाहेर टीकेचे धनीही ठरत आहेत. ...