मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
सेन्सॉर मंडळाचे जर प्रमाणपत्र असेल तर मग पद्मावत सिनेमा गोव्यात प्रदर्शित करण्यास हरकत घेण्याचे कारण दिसत नाही. सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत दाखविण्यास माझा तरी तत्त्वत: विरोध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना ...
गोवा राज्य शैक्षणिक हब बनत आहे. उच्च शिक्षणाला पोषक असे वातावरण या राज्यात असून वार्षिक दीड हजार ते एक हजार आठशे अभियांत्रिकी पदवीधर या राज्यात तयार होत आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे सांगितले. ...
पशु संवर्धनासाठी काम करणाऱ्या बिगरसरकारी संस्थांकडून वारंवार होणाऱ्या बीफच्या तपसाणीविरोधात शनिवारपासून संपावर गेलेल्या बीफ विक्रेत्यांचा संप कायम राहणार आहे. ...
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोव्यातील अनेक रस्त्यांच्या बाजूला अजुनही मोठ्या प्रमाणात पडलेला कचरा पाहून पर्यटकांच्या मनात गोव्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. ...
पणजी - मासे कापल्यानंतर शिल्लक राहणारा कचरा आणि मांसाचे तुकडे केल्यानंतर बाकी राहणारा कचरा गोळा करून त्यापासून सेंद्रीय खत निर्मिती केली जाते असे कुणाला सांगितल्यास विश्वास बसणार नाही. ...