मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
2019 च्या शैक्षणिक वर्षार्पयत ओपिनियन पोलचा इतिहास गोव्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल' असे आश्र्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तोंडी आदेशावरून कदंब पठारावर बेकायदेशीर उत्खनन सुरू होते असे भाजपचेच महासचीव हेमंत गोलतकर यांनी केले असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना समन्स बजावे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम ...
म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कणकुंबी येथे कर्नाटकने युद्धपातळीवर चालू ठेवलेल्या बांधकामाविरोधात राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन या ठिकाणचे पुरावे गोळा केल्यानंतर गडबडलेल्या कर्नाटकने रविवारी या भागात काम थांबविले असून येथील मशिनरी इतरत्र हलविली आहे. ...
कर्नाटकच्या यंत्रणोने म्हादई नदीच्या कळसा-भंडुरा या प्रवाहावर कणकुंबी येथे बांध बांधून गोव्याला येणारे पाणी प्रत्यक्ष कर्नाटकच्या दिशेने वळवले आहे. ...
पोलीस खात्याने वाहतूक नियमांची उल्लंघने रोखण्यासाठी केलेल्या गोवा सेंटिनल योजनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणा-यांवर कारवाई करण्यासाठीही योजना बनविण्याच्या तयारी सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत. ...
आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून गोवा प्रदेश भाजपामध्ये पूर्वतयारीचा जागर सुरू झाला आहे. पक्ष यंत्रणा सक्रिय केली जाऊ लागली असून, येत्या शनिवारपासून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे सुरू करणार आहेत. ...