मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
सरकारी खात्यांकडून येत्या ऑक्टोबर महिन्यापासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. शुल्क आकारणी, कर किंवा अन्य कोणत्याही स्वरुपाचा व्यवहार हा रोख रक्कमेच्या रुपात केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. ...
पणजी : गोव्या च्या रस्त्यावरून मंगळवारी (30 जानेवारी ) पहिली इलेक्ट्रीक बस धावली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी कदंब वाहतूक महामंडळाचे चेअरमन कालरुस आल्मेदा व वरिष्ठ अधिकारी घाटे यांच्यासह कदंबच्या अन्य अधिका-यांसोबत इल ...
जागतिक नकाशावर लौकीकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकणा-या तसेच साक्षरतेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या गोव्यात दोनपैकी एकही जिल्हा खुल्या नैसर्गिक विधीपासून मुक्त नसल्याचे केंद्र सरकारला आढळून आले आहे. ...
गोव्यात टुरिस्ट टॅक्सींना स्पीड गव्हर्नरची गरज नसल्याचे राज्य सरकारचे स्पष्ट मत बनले असून, सक्तीतून वगळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका सादर करण्याची तयारी सरकारने चालवली आहे. ...
गोव्यात स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायला हवा, अशा प्रकारच्या मागणीने जोर धरल्यानंतर व त्या मागणीला छुप्या पद्धतीने काही आमदार व मंत्र्यांकडून विरोधही होऊ लागल्यानंतर हा विषय 51 वर्षानंतर आता गोव्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रत अस्वस्थता ...