मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
तुम्ही बियर पिऊ नका, असे मी कुणाला सांगितले नाही. मी फक्त त्याविषयी चिंता व्यक्त केली, असे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी येथे मंत्रलयात पत्रकारांशी बोलताना केले. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानंतर आर्थिकदृष्टय़ा गोव्यावर कोणता परिणाम होत आहे याविषयीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर करावा, अशा प्रकारची सूचना आपल्याला पंतप्रधानांकडून आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. ...
उत्तर भारतीय पर्यटकांबाबत नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काढलेले उद्गार तसेच हरयानातील पायाभूत सुविधांवर केलेल्या टिकेची गंभीर दखल घेत हरयानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना फोन करुन तीव्र नाराजी व्यक् ...
प्रत्येक काळात युवक किंवा विद्यार्थ्यांचा एक छोटा गट असा असतो, जो नको त्या गैरप्रकारांमध्ये रस घेत असतो. काही विद्यार्थी पोर्न फोटो पाहण्यात रस घेतात तर काही युवक ड्रग्जकडे आकर्षित होतात. ...
पणजी : खनिज लिज नूतनीकरणाचा निर्णय हा खासगी हितासाठी जेव्हा घेतला जातो तेव्हा मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मनोहर पर्रीकर यांना अधिकार राहत नाही. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. क्लॉड अल्वारीस यां ...
गोव्यात दोन ठिकाणी शैक्षणिक वसाहती उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली. वैज्ञानिक संशोधनाला प्राधान्य देण्याच्या हेतूने दरवर्षी ‘इनोव्हेशन इन सायन्स’ ही स्पर्धा उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल. ...