मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच दिवस गोमेकॉ रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना घरी जाऊ देण्यात आले. मुख ...
गेल्या रविवारी डिहायड्रेशन आणि कमी रक्तदाबाच्या त्रासामुळे बांबोळी येथील गोमेकॉ या सरकारी इस्पितळात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी पाचव्या दिवशीही इस्पितळातच आहेत. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी लपवाछपवी करणे हे भाजपाला व राज्य प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना देखील शोभादायक नाही. पर्रीकर यांच्याशिवाय राज्य चालू शकत नाही, असे चित्र मुख्यमंत्री व भाजप मिळून तयार करत आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बुधवारी (28 फेब्रुवारी) चौथ्या दिवशीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सुरूच आहेत. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना डिहाड्रेशनचा त्रास होऊन त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे रविवारी (25 फेब्रुवारी) रात्री बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन हॉस्पिटलमध्ये त्यांना (गोमेकॉ) दाखल करण्यात आले आहे. ...