मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. यामुळे त्यांचा कोणत्याही मंत्री व आमदाराचा संपर्क राहिलेला नसून भाजपाप्रणीत आघाडीचे घटक पक्षही अस्वस्थ झाले आहेत. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंगळवारी रात्री उशिरा उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. मुंबईतील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते अमेरिकेला रवाना झाल्याची माहिती गोवा सरकारने दिली. ...
लीलावती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज मध्यरात्री गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पुढच्या उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत, अशी माहिती त्यांचे स्वीय्य सचिव रुपेश कामत यांनी दिली आहे. ...
मुख्यमंत्री आजारी व गोव्याबाहेर, मुख्यमंत्रीपदाचा ताबा कुणाकडेच नाही, तिघा मंत्र्यांकडे फक्त पाच कोटींर्पयतच्या कामाची फाईल निकाली काढण्याचा फक्त तोंडी अधिकार, लेखी अजून काहीच नाही अशा विचित्र स्थितीतून गोवा राज्य सध्या जात आहे ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांना मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांशी चर्चेनंतर ते अमेरिकेला जाणार आहेत. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचारासाठी राज्याबाहेर जाताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एखाद्या मंत्र्याकडे देण्याऐवजी मर्यादित अधिकार असलेली तीन मंत्र्यांची समिती नियुक्त करून घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम ...
तुम्हा लोकांनी माझ्यासाठी पंधरा दिवस प्रार्थना केली. मला आशीर्वाद दिले व त्यामुळे मी बरा झालो. मी पहिल्या चेअकअपसाठी मुंबईला जात आहे. मी पूर्ण बरा होण्यासाठी कदाचित डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विदेशातही जाईन. ...