मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
काँग्रेस पक्षाने राज्यपालांकडे धाव घेत गोव्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची तक्रार केल्यामुळेच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेहून फोनद्वारे गोव्यातील काही मंत्री व आमदारांशी संवाद साधला, असे राजकीय गोटात मानले जात आहे ...
अमेरिकेला दीड महिन्यांपूर्वी उपचारांसाठी गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळातील दोघा मंत्र्यांना सुखद धक्का दिला. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दोघा मंत्र्यांशी संवाद साधला व आपण ठीक असल्याचे सांगितले. ...
मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेला निघण्यापूर्वी तीन मंत्र्यांची समिती नेमली तरी, सगळे महत्त्वाचे निर्णय हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच अजूनही त्यांच्या कार्यालयातील सचिव कृष्णमूर्ती यांच्यामार्फत घेत आहेत याची कल्पना सर्व मंत्र्यांना आली आहे. ...
अमेरिकेला उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे येत्या मे महिन्यात गोव्यात दाखल होतील हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत काम पाहण्यासाठी नेमलेल्या तीन मंत्र्यांच्या समितीचे आर्थिक अधिकार आता थोडे वाढविण्यात आले आहेत. ...