मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सुमारे तीन महिने अमेरिकेतील इस्पितळात उपचार घेऊन गुरूवारी परतले. मनोहर पर्रीकर यांच्यावरील उपचार यशस्वी झाले असून त्यांची प्रकृती सुधारली आहे, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कधी एकदा गोव्यात येतात असे काही मंत्र्यांना झाले आहे. येत्या 15 रोजी मुख्यमंत्री अमेरिकेहून गोव्यात परतण्याची शक्यता आहे. ...
राज्यातील वीज यंत्रणा पूर्णपणो कोलमडल्यासारखी स्थिती रविवारी दिवसा व रात्रभर तिसवाडी तालुक्यात व राज्यातील अन्य भागांतही अनुभवास आल्यानंतर सरकारला शॉकच बसला आहे. ...
मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि लवकरात लवकर गोव्यात येण्याचा प्रयत्न करत आहे, अशी आशा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांच्याशी अमेरिकेहून बोलताना व्यक्त केली. ...
गोव्यातील अनेक आमदार, मंत्री आदींच्या आरोग्याविषयी तक्रारी वाढू लागल्या आहेत. काही आमदारांना तर मोठ्या शस्त्रक्रियांनाही सामोरे जावे लागू लागले आहे. ...
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचा गोवा सरकारमधील समीकरणांवर विविध अर्थानी परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधील भाजपाचे स्थान आता बळकट बनणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...