मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
तुमच्या विरोधात एखादे आमदार काही बोलले तरी, तुम्ही त्यांना जाहीरपणे उत्तर देऊ नका. जाहीर उत्तर दिल्याने वाद वाढतो. तुम्ही वाद थांबवा, तो वाढवू नका, असा सल्ला भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे. ...
पर्रीकर सरकारमधील ज्येष्ठ भाजप मंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि कळंगुट मतदारसंघाचे भाजपा आमदार मायकल लोबो यांच्यात गेले काही दिवस जोरदार शाब्दिक युद्ध पेटलेले असल्याने व भाजपाही त्या वादावर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याने आता हा वाद मुख्यमंत्री मनोहर पर्रीक ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी पर्वरी येथील सचिवालय तथा मंत्रलयातील आपल्या चेंबरमध्ये येऊन शासकीय कामास आरंभ केला. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मनोहर पर्रीकर यांनी कार्यालयात बसून पुन्हा फाईल्स हातावेगळ्या करणे सुरू केले. ...
तीन महिने अमेरिकेत उपचार घेतल्यानं गुरुवारी गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी माशेल व पणजी येथील मंदिरांना भेटी देऊन देवदर्शन घेतले. ...