मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गोव्याला रेबीजमुक्त करण्यावर गोवा सरकार एकूण 1 कोटी 64 लाख 2 हजार रुपये खर्च करणार आहे. यावर्षी म्हणजे 2018 सालीच गोवा रेबीजमुक्त करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. ...
गोव्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शुक्रवारी सलग काही तास प्रचंड पाऊस पडल्याने बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने कुटुंबांचे अन्यत्र स्थलांतर करावे लागले आहे. ...
राज्यातील खनिज खाण कंपन्यांनी कुठल्याच कर्मचा:याना सेवेतून कमी केलेले नाही, असा दावा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी मंत्रलयात पत्रकारांशी बोलताना केला. ...