मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गेल्या दीड वर्षाच्या काळात वाहतूक नियमांचा भंग केल्या प्रकरणी सुमारे १0 हजार ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे केल्याची माहिती आमदार दिगंबर कामत यांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत ...
गोमंतकीयांनाच रोजगार द्या किंवा नोकरीत घ्या अशी सक्ती आम्ही खासगी उद्योगांवर करू शकत नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्टपणे जाहीर केले. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेतून उपचार घेऊन परल्यानंतर आता गोवा सरकारचे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (आयपीबी)पुन्हा सक्रिय झाले आहे पण या मंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीवेळी फक्त तीनच प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर केले. ...
गोवा हे छोटे राज्य असले तरी, प्रमाणापेक्षा अधिक बुद्धीवान लोक हे राज्य जन्माला घालत आहे. यापूर्वीच्या काळात मंगेशकर कुटुंबीयांनाही गोव्यात संगीत क्षेत्रामध्ये संधी नव्हती. ...