मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
बारा दिवसांची अमेरिका भेट आटोपून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे बुधवारी अमेरिकेहून परतले आहेत. मुख्यमंत्री गेल्या 10 रोजी वैद्यकीय तपासणी व उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते. ...
गोव्यातील प्रत्येक युवकाला रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी सरकारचे नवे रोजगार धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे सध्या उपचारांसाठी अमेरिकेत असून ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासोबतच पुढील उपचारांसाठी अमेरिकेला निघण्यासाठी मुंबईस रवाना झाले. मुख्यमंत्री 17 ऑगस्टर्पयत गोव्यात उपलब्ध नसतील. ...