मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
राज्यात सरकारमध्ये नेतृत्व बदल होऊ शकतात, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपामध्ये फेरप्रवेश करू शकतात, भाजपाचे तीन आमदार फुटतील अशा प्रकारच्या अफवांमुळे गोवा राज्य गेले तीन दिवस ढवळून निघाले आहे. ...
सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष यांनी मिळून पर्रीकर यांची खुर्ची राखली हे आता स्पष्ट होत आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून उपचार घेऊन येत्या 8 सप्टेंबरला गोव्यात परततील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. ...